Nagpur High Court Recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिपाई पदावर 45 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2025 (संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत) आहे.
रिक्त पदाचे नाव: शिपाई
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने किमान 7वी इयत्ता उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असावे. आणि मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सूट दिली जाईल.
परीक्षा फी: ₹50/-
पगार: ₹16,600/- ते ₹52,400/- प्रतिमहिना (तसेच इतर भत्ते मिळतील).
निवड प्रक्रिया: निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होईल:
• चाळणी लेखी परीक्षा: सर्व उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलवले जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक क्षमता व विशेष अर्हता चाचणी घेतली जाईल.
• शारीरिक क्षमता व विशेष अर्हता चाचणी: लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना शारीरिक क्षमता व विशेष अर्हता चाचणीसाठी बोलविण्यात येईल. या चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांना पुढील टप्प्यातील तोंडी मुलाखतीसाठी बोलविले जाईल.
• तोंडी मुलाखत: शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तोंडी मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. तोंडी मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत: उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची अधिक माहिती व पद्धत मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 मार्च 2025 (संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत)
अधिकृत संकेतस्थळ: https://bombayhighcourt.nic.in
भरतीची जाहिरात : Nagpur High Court Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज : Apply NHC Recruitment 2025