MPSC Recruitment 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 28 मार्च 2025 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2025.
एकूण रिक्त जागा : 385
विभाग, संवर्ग आणि रिक्त पदे
सामान्य प्रशासन विभाग : राज्य सेवा गट-अ व गट-ब -127 पदे
महसूल व वन विभाग : महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब- 144 पदे
सार्वजनिक बांधकाम विभाग : महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब- 114 पदे
शैक्षणिक पात्रता:
राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी.
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषिशास्त्र, कृषि अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विदयुत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक.
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2025 रोजी, 18 ते 43 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹344/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 एप्रिल 2025 (11:59 PM)
परीक्षा: 28 सप्टेंबर 2025